
अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात वाचनालयाची चिटणीस प्रकाश वाघ यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. तर विश्वस्त बापू नागावकर यांनी माल्यार्पण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे होते. तर वाचनालयाच्या उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर माधुरी भांडारकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक सामाजिक कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याला व विचारांना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन संयुक्त चिटणीस सुमित धाडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे संचालक पी. एन.भादलीकर व वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.