पिंप्री.ता.धरणगाव (प्रतिनिधी) येथील अंजनी नदीच्या कोरड्या पात्रात आज पहाटे एक कार कोसळून भीषण अपघात झाला. सुदैवाने एअर बॅग उघडल्याने दोघं जण बचावले आहेत.
पिंप्री गावाच्या बाहेर निघतांना वळणावरच अंजनी नदीचा पूल आहे. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास धरणगावकडे स्विफ्ट कार क्र.(एमएच १९ एपी ३१३८) जात होती. कार चालकाचा अचानक कारवरील ताबा सुटल्याने ती पुलाचे कठडे तोडत थेट नदी पात्रात कोसळली. सुदैवाने एअर बॅग उघडल्याने दोघं जण बचावले. दोघं जखमींना गावकऱ्यांनी जळगाव येथे रवाना केले. दरम्यान, दोघं जखमींची नाव समजू शकली नाहीत. परंतु काहींनी सांगितले. एक महिला व पुरुष गाडीत होते. आरटीच्या मोबाईल अॅपवरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता, या क्रमांकाची गाडी शामराव शिर्के नामक व्यक्तीच्या नावावर दिसत आहे. दोघं जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल नसल्यामुळे त्यांच्यावर खाजगीत उपचार सुरु असल्याचा अंदाज आहे. धरणगाव पोलिसात या अपघातासंदर्भात कुठलीही नोंद नव्हती.