Home Cities अमळनेर भरधाव बस रस्त्याच्या कडेला पलटली; दोन जण किरकोळ जखमी

भरधाव बस रस्त्याच्या कडेला पलटली; दोन जण किरकोळ जखमी


जळगाव प्रतिनिधी । प्रवाशी रिक्षाने कट मारल्याने भरधाव बस पटली झाल्याची घटना आज दुपारी वालखेडाजवळ घडली. ही बस अमळनेर आगारातील असून सोनगिरहून अमळनेरला येत होती. अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसून दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.

सविस्तर माहिती अशी की, अमळनेर डेपोची बस बस क्रमांक (एमएच २० बीएल १४१८) ही सोनगिरहून अमळनेर येथे येत असतांना शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावाजवळून आज रविवारी २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या प्रवाशी रिक्षाने कट मारला. रिक्षाला वाचविण्याच्या नादात  बस रोडच्या बाजूला जावून पलटी झाली. यात वाहक संदीप लोहार यांच्यासह पवार कुटुंबियाती दोन जण हे किरकोळ मजूर जखमी झाले. अपघातीची माहिती शिंदखेड आगारला देण्यात आली. जखमी प्रवश्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रवाना केले.  शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नरडाणा पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. 


Protected Content

Play sound