अमळनेर प्रतिनिधी । झाडी येथे श्री ममलेश्वर महादेव मंदिराची दानपेटी फोडून तीन घरांची झाडा झडती करुन चोरीचा प्रयत्न फसल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी पळ काढला आहे. या घटनेत तब्बल १० ते १२ हजारांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चौबारी येथे काही दिवसांपूर्वी आणि गेल्या आठवड्यात देखील चोरांनी घरफोडीचे लागोपाठ सत्र सुरू ठेवले होते. यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, (दि.२०) रोजीझाडी येथे एकाच रात्री मंदिराची दान पेटी फोडून तीन घरांची झाडा झडती करीत चोरीचा प्रयत्न केला तर सुकलाल काळू देवरे यांच्या घराची भिंत तुटली नाही म्हणून अर्धवट सोडून चोरांनी पळ काढला.तर याच झाडी गावातील ममलेश्वर महादेव मंदीरातील दानपेटी फोडून अंदाजे दहा ते बारा हजार रूपयांची चोरी झाल्याची घटना घडल्याने मंदिराचे विश्वस्त यांनी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा नोंदवावा असा अर्ज करून परिसरात सातत्याने होणाऱ्या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. या नेहमीच्या होणाऱ्या चोरीना आळा बसावा यासाठी मारवड पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व ग्रामस्थांमधे असलेली भीती घालवण्यासाठी देखील प्रयत्न करावेत अशी जनमाणसातून मागणी होत आहे.