सम्राट कॉलनी येथे तरूणावर धारदार शस्त्राने वार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील सम्राट कॉलनी येथील १८ वर्षीय तरूणावर जुन्यावादातून धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लखन अशोक झाल्टे (वय-१८) रा. सम्राट कॉलनी, जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन झाल्टे हा आईवडील व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. तो फुले मार्केटमधील मनोहर कापड दुकानात कामाला आहे. रविवार २०  फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास लखन झाल्टे हा दुध घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे रोहीत लालचंद चव्हाण रा. ईच्छादेवी मंदिराच्या मागे तांबापूरा जळगाव हा तिथे आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून लखन याच्यावर धारदार वस्तूने मानेवर, पाठिवर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत लखन याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता लखन झाल्टेची आई हीरा झाल्टे यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी  रोहीत लालचंद चव्हाण रा. ईच्छादेवी मंदिराच्या मागे तांबापूरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहे.

Protected Content