जळगाव प्रतिनिधी । काम संपवून मित्रांसोबत मेहरूण तलावावर फिरायला गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. आज तिसऱ्या दिवशी मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
साईनाथ शिवाजी गोपाळ (वय-२२) रा. धामनगाव वाडा समता नगर असे मयत तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, बुधवारी १२ ऑगस्ट रोजी साईनाथ याने दुपारी काम संपवुन पिंप्राळा रेल्वे गेट जवळूनच तो, त्याचा नातेवाईक ज्ञानेश्वर अर्जुन गोपाळ आणि मित्र सोनू सुरेश गोपाळ अशांसोबत निघाला होता. अजिंठा चौकातून तीघांनी मेहरुण तलावावर जाण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने सोनू गोपाळ देाघांना सोडून तेथुन निघुन गेला हेाता. येथे बराच वेळ टाईमपास केल्यानंतर साईनाथ व ज्ञानेश्वर अशा देाघांनी बराच वेळ तलावात पोहण्याचा आनंद घेतला. संध्याकाळपुर्वीच ज्ञानेश्वरने त्याला घरी जाण्यासाठी हट्ट करीत होता. मात्र, हातपाय आणि अंगातील कपडे मळकट झाल्याचे सांगत साईनाथ तलावातील कपडे धुण्याच्या काठावर आला. नंतर तो बेपत्ता झाला.
कुटूंबीयांची शेाधा शोध
रात्री उशिरा पर्यंत साईनाथ घरी परतला नाही म्हणुन त्याचा भाऊ राकेश व कुटूंबीयांनी शोध सुरु केला. तर, तिघे मित्र मेहरुण तलावावर गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तेथेही शोध घेतला. तलाव काठावर त्याचे कपडे मिळून आल्यानंतर कुटूंबीय पेालिस ठाण्यात धडकले. रात्रीच सहाय्यक निरीक्षक संदिप पाटील, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील अशांनी मेहरुण तलाव गाठले. मात्र, अंधार असल्याने उपयोग होणार नाही म्हणून.. पेाहणाऱ्यांनी तलावात जाण्यास नकार दिला. दिवस उजाडल्या नंतर सकाळ पासून पट्टीचे पोहणारे तलावात उतरवुन साईनाथ गोपाळ याचा शोध सुरु होता. मात्र, दुपार पर्यंतही त्याचा शोध न लागल्याने अखेर आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, आसीम तडवी यांच्यासह पथक बोटीद्वारे पहाणी करुन पेाहणाऱ्यांना तलावाच्या तळाशी शोध घेण्याचे काम सुरु होते. दरम्यान आज सकाळी ८ वाजेच्यासुमारास मयत साईनाथचा मृतदेह पाण्यात आढळून आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात येत आहे.
Jalgaon Crime, jalgaon crime news, jalgaon police, meharun dam, MIDC police station, samata nagar, jalgaon civil hospital,