कुजलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बोरगाव शिवारातील एका शेतात अंदाजे २५ वर्षीय अनोळखी तरूणाचा डोकं व एक हात वेगळा होवून कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बोरगाव शिवारातील एका शेतात अंदाजे २५ वर्षीय अनोळखी तरूणाचा डोक आणि अर्धवट खाल्लेला हात वेगळा असा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल अनिल साळुंखे, वनरक्षक सुनील तोडकर, गणेश धानोरे, वनमजूर शांताराम पाटील, गजानन सैंदाणे, धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले, पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ, पोलीस कर्मचारी सत्यवान पाटील, योगेश पाटील पंकज पाटील, वर्षा गायकवाड, दिपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून धरणगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र चव्हाण यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. मयताची ओळख पटवावी असे आवाहन धरणगाव पोलीसांनी केले आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली., पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे करीत आहे.

Protected Content