Home क्राईम माहिजी रेल्वे स्टेशनजवळ अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

माहिजी रेल्वे स्टेशनजवळ अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

0
35
death

 

जळगाव प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील माहिजी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावर ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलीसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुकयातील माहिजी रेल्वे स्टेशनजवळी अप लाईनवरील खांबार क्रमांक ३८८/ ४ व ६ च्या दरम्यान एका ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह रुळावर पडलेला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. दरम्यान योगेश आडकणे व अनिल नायडु यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची तपासणी करीत ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याकडे काहीच मिळून न आल्याने रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आहे. याप्रकरणी माहिती रेल्वे स्टेशन प्रबंधकाच्या खबरीवरुन रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास योगेश अडकणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound