जळगावात अनोखळी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एका ४५ वर्षीय अनोळखी पुरूषांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी २२ जून रोजी दुपारी १ वाजता एका ४५ वर्षीय अनोळखी पुरूषांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी धाव घेवून शहर पोलिसांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओळख पटविण्याचे आवाहन तपासाधिकारी रवींद्र सोनार यांनी केले आहे.

Protected Content