साकळी येथील बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह नदीपात्रात आढळला; यावल पोलीसात मृत्यूची नोंद

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडासिम परिसरात भोनक नदी पात्रात अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला असून यावल पोलिसात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गंभीर उर्फ मनोज हबीब तडवी असे मृत अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनोज  ४ जुलै पासुन घरातुन बेपत्ता होता. मात्र, सावखेडासिम ता. यावल गावाजवळील सातपुड्याच्या भोनक नदी पात्रामध्ये शुक्रवारी एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पिक सरंक्षण सोसायटीच्या पिक रक्षक (ठेंगेदार) रसुल नामदार तडवी व सिकंदर हिम्मत तडवी यांना आढळून आले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, पिंटू बागुल, भूषण गाजरे यांनी शवविच्छेदन केले असून मृताचे कपडे ताब्यात घेतले. यात मयताच्या शर्टच्या कॉलरला बी. एस. टेलर असे नावाचे लेबल होते, त्यावरून तपास केला असता मृताचे ओळख पटली आहे.

तथापि, साकळी येथून ४ जुलैपासुन मनोज तडवी बेपत्ता असून हा गतीमंद तरूण असल्याचे समोर आले आहे. शनिवारी तडवी कुटुंबीयांनी कपडे पाहून हे मनोजचे कपडे असल्याचे सांगितले आहे. यावरुन तरुणाची ओळख पटवली आहे. दरम्यान याप्रकरणी मनोज हरवल्याची ७ जुलै रोजी तक्रार देखील यावल पोलीस स्टेशन स्थानकात देण्यात आली होती. मयताच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. 

 

Protected Content