मुंबई (वृत्तसंस्था) अमित शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन पहिल्यांदाच माझ्यावर, ठाकरे कुटुंबीयावर खोटेपणाचा आरोप केला याचे दुःख वाटले, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता असा खळबळजनक आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हटले की, अमित शाह यांच्या नावाचा वापर करुन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलले आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. सत्तेची खुर्ची माणसाला किती वेडं करते हे मी पाहिलं. देवेेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी चर्चा थांबवली हे खरं आहे. कारण ५०-५० चा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असं म्हणून मला खोटं ठरविण्याचा प्रयत्न झाला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मी पाहिली ती पाहून मला आनंदही वाटला आणि दुःखही वाटले. झाला की अनेक विकासकामांचा पाढा त्यांनी वाटला त्यावेळी त्यांनी उल्लेख केला की शिवसेना सोबत होती की नाही? असा उल्लेखही त्यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात मी काहीही बोललो नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.