Home धर्म-समाज यावल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

यावल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
55

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील समाज बांधवांच्या वतीने स्वातंत्र चळवळ आणि स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीतील व्यक्तिमत्व आपल्या साहीत्याव्दारे परिवर्तनास मार्ग दाखविणारे समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

सोमवार, दि. १ ऑगस्ट रोजी यावल येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या प्रसंगी यावलचे माजी नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली यात डॉ. फेगडे यांनी ढोल ताश्यांच्या व झांजच्या गजरात ठेका धरला

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल बिहाले,  प्रदीप पारधे,  सुरेश नटके,  युवराज मोरे,  रमेश जाधव,  श्रावण सुरकळ, विकास मोरे, कैलास मोरे आदींची उपस्थिती राहून मोलाचे सहकार्य केले.


Protected Content

Play sound