Home क्राईम घरासमोर लावलेली दुचाकी चोरीला

घरासमोर लावलेली दुचाकी चोरीला

0
78

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगावातून घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सत्तार बिस्मिल्ला पिंजारी (वय-४२) वर्ष राहणार किनगाव खुर्द हे दिनांक २६ मार्च रोजी आपल्या मित्रासोबत फैजपुर येथे गेले होते ते रात्री ८ वाजता किनगाव येथे आपल्या गावी परतल्यावर रात्री त्यांनी आपल्या घरासमोर लावलेली बजाज पल्सर हे दुचाकी वाहन कुणीतरी घेवुन गेल्याची बाब दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर आल्यावर आदी सर्वत्र शोध घेतल्यावर समजले , अखेर पिंजारी यांनी बजाज पल्सर या कंपनीची सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच १९ सिके ४७८५हे दुचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दिली असुन यावल पोलीस स्टेशनमध्ये सत्तार बिस्मिल्ला पिंजारी यांनी दिलेल्या माहीतीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. 


Protected Content

Play sound