
मुंबई (वृत्तसंस्था) माटुंगा येथील बिग बाजारमध्ये आज सायंकाळी भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून अग्निशमन दलाचे जवान पाण्याचे बंब व टँकर घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, इमारतीतून प्रचंड मोठे धुराचे लोळ उठत आहेत.
माटुंगा पश्चिम येथील तुळशी पाइप मार्गावर असलेल्या बिग बाजारमध्ये आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर बिग बाजार असून कपडे तसेच गृहोपयोगी साहित्यामुळे आग वेगाने पसरल्याचे कळते.