पुणे (वृत्तसंस्था) देशातील टॉपचे गुप्तहेर सुर्यकांत भांडेपाटील हे आपल्या पत्नी व मुलासह पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेवून विक्रम करणार आहेत. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण असोसिएटस मुंबई यांच्यातर्फे रविवार दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी संकरॉक लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडिया, अशी जलतरण स्पर्धा होणार आहे.
पुणे येथिल बांधकाम व्यवसायीक तथा देशातील टॉपचे गुप्तहेर,वसुंधरासमूहाचे संचालक आणि प्रसिध्द जलतरणपटू सुर्यकांत भांडे पाटील (वय ५३) सोबत सातारा येथील जि.प.आदर्श शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी प्रतिभा भांडेपाटील (वय ५३) व सिव्हिल इंजिनियर असलेला त्यांचा मुलगा सौरभ (वय २६) असे तिघं जण जलतरण स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशा स्पर्धेमध्ये आई-वडील आणि मुलगा सहभागी होण्याचा हा देशातील पहिलाच विक्रम भांडेपाटील परीवाराच्या नावावर रविवारी स्पर्धेत भाग घेतल्यावर नोंदवला जाणार आहे.
सूर्यकांत भांडेपाटील व त्यांचा मुलगा सौरभ भांडेपाटील यांच्या नावावर आता पर्यंत 36 कि.मी,57 कि.मी , 81 कि.मी असे सागरी पोहण्याचे विक्रम आहेत. तसेचभांडेपाटील परीवाराने आता पर्यंत (पती ,पत्नी व मुलगा मिळून) मुंबईच्या समुद्रात व मालवण समुद्रात भाग घेवून विक्रम केलेले आहेत. सूर्यकांत भांडे पाटीलांनी गुप्तहेर म्हणून आता पर्यंत 150 हून अधिक अपहरणाच्या केसेस सोडवलेल्या असून सदर केसेस सोडवण्यासाठी ते कुठलेही मानधन घेत नाहीत.