जळगाव (प्रतिनिधी) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यातील एकूण 12 शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश प्रक्रीया सुरू झालेली आहे. या वसतीगृहात प्रवेश घेवू ईच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थी प्रवेश प्रक्रीया – ऑफलाईन प्रवेशासाठी 4 जूलै, 2019 पर्यंत अर्ज करावेत. त्याची पहिली निवड यादी 8 जुलै रोजी अंतिम करुन प्रसिध्द करणेत येईल. पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशासाठी 21 जूलै ही अंतिम मुदत असेल. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची 22 जूलै रोजी निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. दुसरी निवड यादीतील विद्यार्थ्यांना 31 जुलै पर्यंत प्रवेश देण्यात येतील. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॅाट ॲडमिशन देण्यात येतील.
इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यवसायीक वगळून) अभ्यासक्रमांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी 14 जूलै पर्यंत अर्ज करावेत. त्याची पहिली निवड यादी 8 जुलै रोजी अंतिम करुन प्रसिध्द करणेत येईल. पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशासाठी 21 जूलै ही अंतिम मुदत असेल. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची 22 जूलै रोजी निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. दुसरी निवड यादी 10 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी होईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 20 ऑगस्ट पर्यंत प्रवेश देण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास 21 ऑगस्ट पर्यंत स्पॉट ॲडमिशिन देण्यात येईल.
बी.ए/बी.कॉम/बी.एस्सी/ अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका आणि एम.ए / एम.कॉम/पदवी व पदवीका इत्यादि अभ्यासक्रमास (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश इच्छूतांना ऑफलाईन प्रवेशासाठी 24 ऑगस्ट हा कालावधी निर्धारित केलेला आहे. पहिली निवड यादी अंतिम करण्याचे काम 27 जूलै पर्यंत पूर्ण होईल पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना 14 ऑगस्ट अंतिम मुदत आहे. रिक्त जागेवरील प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 16 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 24 ऑगस्ट पर्यंत प्रवेश देण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त झाल्यास 30 ऑगस्ट पर्यंत स्पॉट ॲडमिशन पध्दतीने प्रवेश देण्यात येतील.
व्यावसायीक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पध्दती :- 28 ऑगस्ट पर्यंत ऑलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रीया राबविली जाईल. पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्दी करणेसाठी 31 ऑगस्ट पर्यत निर्धारित करण्यात आलेली आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम तारीख 5 सप्टेंबर अशी आहे. रिक्त जागेसाठी प्रतिक्षा यादीवरील विद्यार्थ्यांना 9 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देण्यात येतील. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 12 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देण्यात येतील. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास 18 सप्टेंबर पर्यंत स्पॉट ॲडमिशन पध्दतीने प्रवेश देण्यात येतील.
तरी वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रीया व वसतिगृहांची नावे, रिक्त जागांची आरक्षणनिहाय माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.