यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल वनक्षेत्र विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेस हडपे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सातपुडा कुंडया पाणी क्षेत्रात कारवाई करीत सागवान जातीच्या लाकडाने तयार केलेले बेलन व मोटरसायकल वन विभागाच्या वतीने जप्त करण्यात आली आहे.
वन विभागाच्या सुत्रांकडून या संदर्भात मिळालेली माहिती अशी की सातपुडा पर्वताच्या यावल वन क्षेत्रातील कुंड्या पाणी पथकासह हुंडा पाणी परिसरातील वनविभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १४ मार्च गुरूवार रोजी वरगव्हाण रस्त्याने गस्त करीत असतांना एका अज्ञात विना क्रमांकाच्या बजाज कंपनीच्या दुचाकी मोटरसायकलने अवैधरित्या सागवान या मौल्यवान वृक्षाची तोड करून तयार केलेले ३१० अनगड बेलन व दुचाकी वाहन सुमारे २५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल वाहतुक करतांना आढळुन आले असुन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केले असता तो मोटरसायकल फेकुन पसार झाला यावल विभागाचे वनसंरक्षक जमीर शेख व उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पाल,अडावद वनक्षेत्राचे वन संरक्षक प्रशांत साबळे, वनपाल कुंडया पाणी भावना चव्हाण, वनरक्षक समीर तडवी, इंद्रसिंग पावरा, वनमजुर हैदर तडवी, संजय माळी व वन मजुरांच्या माध्यमातुन करण्यात आले.