दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील कोदगाव रोडवरील कृष्णराव देशमुख यांच्या घरावर २६ जून २०१५ रोजी रात्री शसस्त्र दरोडा पडला होता. त्यात राहुल कृष्णराव देशमुख (२३) याचा खुन करुन ६ लाख ७० हजार रुपये रोख व सोन्याचे दागीने असा १० लाख ३४ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. त्या गुन्ह्यातील ९ पैकी ५ आरोपी अटक झाले तर ४ आरोपी फरार होते. त्यातील अमोल शंकर बोरकर (२५) या संशयीताला नुकतेच चाळीसगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

रमेश छगन भोसले (वय २९, रा साईनाथ नगर नागफणी ता नेवासा जि अहमदनगर) या आरोपीला चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सुधीर पाटील व पथकाने मागील आठवड्यात अटक केली होती. याच गुन्ह्यातील एक फरार आरोपी हा त्याच्या मुळ गावी बेलपिंपळगाव (ता नेवासा जि अहमदनगर ) येथे आला असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि २५ मार्च रोजी आरोपी अमोल शंकर बोरकर (२५) यास त्याच्या घरुन दुपारी पोउनि सुधीर पाटील यांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक जय तोडमल, पो कॉ रवी पवार यांच्या मदतीने अटक केली आहे. आरोपीला चाळीसगाव येथे आणले असून त्याच्याकडून गुन्ह्याची माहिती उघड होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

Add Comment

Protected Content