अमळनेर (प्रतिनिधी)येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे 11 विद्यार्थ्यांनी सीएम चषकात यश संपादन केले. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डी. डी पाटील,उपाध्यक्ष व. ता. पाटील यांनी कौतुक केले आहे.
सीएम चषकात झालेल्या विविध स्पर्धेत जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अक्षय सुरेश पाटील (शिकाई मार्शल आर्ट),गणेश रमेश चौधरी(ज्यूडो),यश प्रताप शिंपी(ज्यूडो व कुस्ती),निकिता संजय पाटील(कुस्ती),प्रणाली सूर्यवंशी,अश्विनी बाळापुरे, रुंदा पाटिल,मनीषा पाटील,हर्षली सुर्यवंशी(रांगोळी स्पर्धा),प्रियंका पाटील(हॉली बॉल),जयेश पाटील(कॅरम) या 11 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.त्यांना शाळेतील शिक्षक विजय पाटील, विवेक पाटील,क्रीडा संचालक शैलेश पाटील, प्रीतेश पुरणकर यांचे मार्गदर्शन लाभले.