Home Uncategorized लाडशाखीय वाणी समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात !

लाडशाखीय वाणी समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाने आयोजित केलेला गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात समाजातील सुमारे २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मेजर नाना जे.एन. वाणी यांनी भूषवले. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जयेश्णू आयआयटी गुरुकुलच्या संचालिका सविता वाणी, माजी महानगराध्यक्ष श्री. गजानन मालपुरे, सहायक उत्पन्नकर आयुक्त प्रितेश बाविस्कर, तसेच डॉ. सतीश शिंदाडकर, गणेश अमृतकर, महिला व बालविकास अधिकारी मनीषा मोरणाकर, आणि अक्षय मालपुरे (असिस्टंट ट्राफिक मॅनेजर) यांसारख्या विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, आ.सुरेश भोळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मेजर नाना वाणी यांनी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यशच नव्हे तर जीवनात सामाजिक आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श निर्माण झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखाताई शिरोडे, सीमा कोठावदे, अरुणा नेवाडकर, प्रशांत पाटे, रवींद्र नेवाडकर, महेंद्र कोठावदे, किशोर पाटे, अमोल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोठावदे, अभिजीत येवले आणि सौ. सुजाता पाखले यांनी केले, तर आभार श्रीमती अल्का पितृभक्त यांनी मानले. या भव्य सोहळ्याने लाडशाखीय वाणी समाजातील एकोपा आणि शैक्षणिक प्रगती दिसून आली.


Protected Content

Play sound