जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी)च्या पोलीस निरीक्षकपदी किसनराव नजन-पाटील यांच्या नियुक्तीला पोलिस महानिरीक्षक (आयजी) बी.जी.शेखर (B G Shekhar) यांनी स्थगिती दिली आहे.
एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले (PI KiranKumar Bakale) यांना निलंबित करण्यात आले होता. त्यांच्याकडे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार होता. त्यांच्या निलंबनानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील (Kisanrao Najan-Patil) यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस निरीक्षक पदाचा पदभार देण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी काढले होते. त्यानुसार आज सकाळी पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार देखील घेतला होता. परंतू आज दुपारी पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे (Superintendent of Police Pravin Mundhe) यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले.