मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे एक विचीत्र घटना घडली असून आपली बायको माहेरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांनीच याला फुस दिल्याच्या संशयातून सख्या मुलाने त्यांची घर जाळून टाकले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावातली ही घटना आहे. यात संशयित आरोपी समाधान भीमराव घोडकी याची बायको अलीकडेच त्याला माहेरी गेली होती. आपले वडील व आई यांच्यामुळेच बायको माहेरी गेल्याचा संशय त्याच्या मनात बळावला. यावरून त्याने आई-वडिलांना धमकावले देखील होते. यानंतर बापावरती संशय घेत दगड घेऊन तुम्हाला मारतो असा धमकावत त्याने सर्व घरातील वस्तू जाळून टाकले. यात किमान आठ हजार रुपये किमतीचे संसार उपयोगी , कपडे, धान्य, गादी, पलंग व घरातील इतर साहित्य जळून खाक झाले.
या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला समाधान घोडकी याची आई सौ सुरजाबाई भिमराव घोडकी यांच्या फिर्यादी वरून त्याच्या विरोधात भादंवि कलम ४३६,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ. संजीव पाटील करत आहेत.