चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खडकी बु. एमआयडीसीतील गुजरात अंबुजा कंपनीचा दुर्गंधीयुक्त उग्रवास पुन्हा सुरु झाला आहे. या वासामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून ही दुर्गींधी १५ दिवसाच्या आत बंद न झाल्यास चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा ईशारा रयत सेनेच्यावतीने प्रांताधिकारी व गुजरात अंबुजा कंपनीला निवेदनाद्वारे आज देण्यात आला.
रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील खडकी बु. एमआयडीसीत असलेली गुजरात अंबुजा कंपनी मका व धान्यावर प्रक्रीया करुन उत्पादन करते. या प्रक्रीयेवेळी त्याचा दुर्गंधीयुक्त उग्र वास परीसरात पसरतो. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील वर्षी अशाच पद्धतीचा उग्र वास येत असल्याने रयत सेनेच्या वतीने निवेदन देऊन वास बंद करण्याची मागणी केली होती. आगोदर टाळाटाळ केल्यानंतर रयत सेनेने आंदोलन केल्यावर कंपनीने तो वास बंद झाला होता. मात्र, यावर्षी गेल्या काही दिवसांपासुन हा दुर्गंधीयुक्त वास पुन्हा सुरु झाल्याने आजूबाजूची गावे व शहरातील काही भागाच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण आहे.
या उग्र वासाने चाळीसगाव शहरातील विमानतळ मित्रा टाईप, शिवाजी नगर,नवलेवाडी, महाराणा प्रताप हाऊसिंग सोसायटी, मालेगाव रोड, हिरापूर रोड वरील सानेगुरुजी नगर, शशीकला नगर, स्वामी समर्थ नगर, गवळी वाडा,पवार वाडी,महावीर कॉलनी, संभाजी नगर, आदर्श नगर, भडगाव रोडवरील, शास्त्रीनगर सम्राट नगर, शाहुनगर करगाव रोड, वामन नगर, शंभू नगर, धुळे रोड परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या दुर्गंधीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ते आजारी पडत आहेत. तसेच शेजारी असलेला खडकी बुद्रुक गावातील ग्रामस्थांना गावांमध्ये राहणे देखिल कठीण झालेय. परिणामी या दुर्गंधीमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन सदर दुर्गंधीचा कायमचा बंदोबस्त करावा. अंबूजा कंपनीच्या व्यवस्थापकांनी त्यावर कायमचा उपाय शोधून अंबूजा कंपनीत सुधारित यंत्रणा बसवून नागरिकांना दिलासा द्यावा. कंपनीमधून निघत असलेल्या दुर्गंधीचा पंधरा दिवसात कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने तहसील कार्यालया समोर उग्र आंदोलन तसेच कंपनी विरोधात न्यायालयात याविरोधात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. निवेदनाच्या प्रती उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री जळगाव, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, पर्यावरण व प्रदूषण मंत्री म. राज्य, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी जळगाव, आमदार चाळीसगाव, प्रांताधिकारी चाळीसगाव, शहर पोलिस निरीक्षक चाळीसगाव, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ धुळे यांना पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार .प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड,शेतकरी सेना तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना पंकज पाटील,शहर अध्यक्ष योगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे,शहर कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर, समन्वयक रोहन पाटील,विजय सोनवणे, प्रफुल्ल देशमुख, अरविंद पाटील,शुभम देशमुख, समाधान सूर्यवंशी,दीपक सोनवणे,दीपक देशमुख,शैलेश कुमावत, मधुकर चव्हाण,मराठा सेवा संघाचे अरुण पाटील आदींच्या सह्या आहेत.