Home धर्म-समाज डॉ. पायल तडवी आत्महत्त्याप्रकरणी यावल येथे गुरुवारी धरणे आंदोलन

डॉ. पायल तडवी आत्महत्त्याप्रकरणी यावल येथे गुरुवारी धरणे आंदोलन


Capture 21

यावल (प्रतिनिधी) डॉ. पायल तडवी आत्महत्त्याप्रकरणी दोषींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयाबाहेर गुरुवारी (दि.३०) धरणे आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचने एका पत्रकाद्वारे दिला आहे.

 

या पत्रकात म्हटले आहे की, जळगाव येथील रहिवासी असलेल्या डॉ. पायल तडवी यांचा जातीच्या आधारावर मानसिक छळ करून त्यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांच्या मुंबई येथील नायर हॉस्पिटलच्या होस्टेलमधील पार्टनर डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयाबाहेर दि. ३० रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत हे धरणे आंदोलन केले जाणार आहे. तसेच दि. २९ रोजी फैजपूर येथे सायंकाळी ७.३० वाजता श्रीराम ऑटो ते रिक्षा स्टॉपपर्यंत ‘कँडल मार्च’ काढण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound