जळगाव, प्रतिनिधी | पीक कर्ज वाटपाबाबत बँकांकडुन अडवणूक होत असून शासनही उदासीनता दाखवीत आहे, याबाबत उद्या (दि.१०) दुपारी ३.०० वाजता जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचा जाहीर निषेध करण्यात येऊन तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
मालाड (मुंबई) येथे भ्रष्टाचारामुळे भिंत कोसळून २७ जणांचा बळी गेला. तसेच तिवरे (जि.रत्नागिरी) येथे धरण फुटल्याने १९ जणांचा मृत्यू झाला तर चार जण बेपत्ता आहेत. या घटनांमधील दोषींवर कारवाई करण्याबाबत राज्य सरकारने अक्षम्य निष्क्रियता दाखवली आहे. तसेच व पीक कर्ज वाटपाबाबत बँकांकडुन अडवणूक केली जात आहे. यात राज्य सरकारची उदासीनता दिसून येत आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर कर लावण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपये ५० पैशांनी भरमसाठ वाढ केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर बोझा पडणार आहे. या निर्णयाविरुद्ध उद्या तीव्र आंदोलन करण्यात येणार असून जिल्ह्यातील काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांनी केले आहे.