Home Cities जळगाव शिक्षिकेची पर्स लांबविणारा आरोपी अटकेत

शिक्षिकेची पर्स लांबविणारा आरोपी अटकेत


जळगाव (प्रतिनिधी) शहरातील भाऊंच्या उद्यानाजवळील रस्त्यावर जाणता राजा व्यायाम शाळेजवळ शाळेत जाणार्‍या शिक्षिका मंजुषा रवींद्र पाठक (व्यंकटेश कॉलनी, महाबळ) यांची दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पर्स लांबवली होती. यातील नाजीर खान खान पटवे (गेंदालाल मिल, जळगाव) या चोरट्याला गुरुवारी कोर्ट चौकातून रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे.

 

पर्समध्ये सोन्याची चैन व अंगठी, मोबाइल असा एैवज होता. पर्स लांबविल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात 22 डिसेंबर 2018 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासात ही चोरी आरोपी नाजीर खान खान पटवे (गेंदालाल मिल, जळगाव) याने केल्याचे निष्पन्न झाले होते. नाजीर हा गुरुवारी शिवाजी पुतळ्याजवळ असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकातील प्रदीप चौधरी यांना मिळाली होती. त्यांना याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना माहिती दिली तसेच हवालदार मनोज इंद्रेकर, प्रदीप चौधरी, ज्ञानेश्‍वर कोळी यांच्यासह नाजीरला ताब्यात घेतले. जिल्हापेठ परिसरातही त्याने चोरी केली असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound