म्हैस आडवी आल्याने दुचाकी घसरून अपघात : दोघे जखमी

2401159 orig

जळगाव (प्रतिनिधी) तोंडापूर येथून मांडवी येथे दुचाकीने घरी जात असताना रस्त्यात म्हैस आडवी आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जन जखमी झाले आहेत. जखमींपैकी एक जण गंभीर असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जगन संतोष जाधव (वय ३३) (रा. मांडवे बुद्रुक, ता.जामनेर) हे आपल्या मित्रासोबत तोंडापूर येथून दुचाकीने मांडवी येथे येत असताना सकाळी ९.३० च्या सुमारास गावाजवळ टॉवर नजीक असताना एक म्हैस अचानक आडवी येवून तिने दुचाकीला धडक दिली, या अपघातात दोघेजण खाली पडले. यामध्ये जगन जाधव यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content