भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील एका डॉक्टरच्या दवाखान्याला लावलेला ३५ हजार रुपये किमतीचा ए.सी. अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. सुनील प्रकाश रत्नानी (वय-४८, रा. रत्नानी हॉस्पिटल, बद्री प्लॉट, भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. वैद्यकीय व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे भुसावळ शहरातील आठवडे बाजारात ओम कृष्णा डेंटल क्लिनिक नावाचे दवाखाना आहे. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दवाखान्यासाठी लावलेला ए.सी हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आले. या संदर्भात डॉक्टर सुनील रतनानी यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर हे करीत आहे.