नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जीडीपीचा 5 टक्के दर हा माझ्यासाठी धक्काच होता,असे सांगत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी जीडीपीचा दर घसरल्याची कबुलीच दिली आहे.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शशिकांत दास यांनी सांगितले की, 2020 च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर 6.9 वर नेण्याचे उद्दिष्ट आहे. पण जीडीपीचे आकडे अंदाजापेक्षा कमी आहेत. त्यामुळेच जीडीपीचा दर वाढवण्याला आरबीआयचे प्राधान्य आहे. परदेशी गुंतवणुकीचा ओघ मागच्या वर्षीपेक्षा चांगला आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांची महागाई काही दिवसांनी कमी होईल. शहरात दूध आणि अंड्यांच्या किंमतींमध्ये मात्र वाढ झाली आहे, याचा देखील दास यांनी उल्लेख केला.