तिसऱ्या बुद्धिस्ट क्रिकेट लीगचा जल्लोषात समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व-3 चे आयोजन 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान भव्यदिव्य स्वरूपात करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून एकूण 16 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या लीगमध्ये तब्बल 300 हून अधिक खेळाडूंनी आपली क्रिकेट कौशल्ये दाखवली.

सामाजिक एकोपा व क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा उद्देश ठेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समाज बांधवांनी संघमालकाची जबाबदारी सांभाळून स्पर्धेला भक्कम पाठबळ दिले. 9 फेब्रुवारी रोजी रंगलेल्या अंतिम सामन्यात संविधान वॉरियर्स 358 संघाने पंचशील द पाथ मेकर संघाचा पराभव करत चषकावर आपले नाव कोरले. तिसरे पारितोषिक रमाई सुपर किंग्स तर चौथे पारितोषिक भीमा कोरेगाव फायटर्स संघाने पटकावले.

खास पारितोषिक विजेते:

फेअर प्ले अवॉर्ड: भीम वॉरियर्स
मॅन ऑफ द सिरीज: संदेश सुरवाडे
बेस्ट बॅट्समन: शुभम अहिरे
बेस्ट बॉलर: वेदांत शिंदे
विशेष सन्मान:
आयुष्यमान जयेश मोरे यांना छत्रपती श्री शिवाजी राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आयुष्यमान राजेशजी झाल्टे साहेब होते. बॅनर स्पॉन्सर प्रफुल बोरकर सर, मनोहर तायडे सर, अनिल बैसाणे सर, बॉलर्स स्पॉन्सर आकाश बाविस्कर, ड्रिंक्स ट्रॉली स्पॉन्सर रोहित मोरे यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. आयुष्यमान आशिष सपकाळे, भारती रंधे, अभिजीत रंधे, सतीश गायकवाड, गौरव गायकवाड, त्रुशाल सोनवणे, सुहास पवार, सिद्धांत अहिरे, विशाल अहिरे, राधे शिरसाठ यांच्यासह इतर संघमालकांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. मुख्य आयोजक आयुष्यमान विक्रम रंधे, पवन कुमार मेढे, आशिष सपकाळे, दिनेश अहिरे, सतीश गवई, सचिन सरकटे, यश सोनवणे आदींच्या मेहनतीमुळे स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली. या स्पर्धेला समाजातील शेकडो बांधवांनी उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला. पाच दिवस रंगलेल्या या सामाजिक व क्रीडा सोहळ्याने उत्साह, बंधुभाव, आणि एकोप्याचे वातावरण निर्माण केले.

Protected Content