राज ठाकरेंचे ते विधान बालीशपणाचे – आठवले

mofi885ramdas

 

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी भूमिका असणाऱ्या राज ठाकरे यांचे ते विधान बालिश पणाचे आहे, अशी टीका केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. मात्र, यावरुन राजकारण करता कामा नये. राज ठाकरेंनी या हल्ल्यामागे मोदींना जबाबदार धरलं असून मोदींनेच हा हल्ला घडवून आणल्याचा राज यांचा आरोप बालिशपणाचा आहे, असे आठवलेंनी म्हटले आहे.

 

जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ला घडवून आणला आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. मात्र, मोदींनीच हा हल्ला घडवल्याचे सांगणे हे अतिशय बालिशपणाचं लक्षण आहे. आता, एअर स्ट्राईक करुन बदला घेतला, पण विरोधक म्हणातायेत की, निवडणुकांच्या उद्देशाने हा स्ट्राईक केला आहे. जर बदला घेतला नसता, तर म्हटले असते या सरकारने काहीच केले नाही. मला वाटतं एअर स्ट्राईकवरुन तरी कुणी राजकारण करू नये, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना चपराक लगावली आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी पुलवामा हल्ल्यातील शहीद हे राजकीय बळी असल्याचं वक्तव्य केलं होते. कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलतान राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच अजित डोवाल यांच्याही चौकशीची मागणी केली होती. आज, उल्हासनगर येथील पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला. पाकिस्तानने भारतासोबत दोस्ती करावी, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताला मदत करावी. सध्या देशात वातावरण बदलले असल्याने एनडीएला 300 च्या जवळपास जागा मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, शेवटी जनता जनार्दन मोठी असून त्यांचा कौल आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Add Comment

Protected Content