म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाणे- भातखळकर

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | खा. सुप्रिया सुळे यांचा आरोप म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाणे असाच असल्याची टीका भाजपचे आ.अतुल भातखळकर यांनी ट्वीटवरून केली आहे.

आमच्या दोन नेत्यांची काही चुकी नसताना केवळ केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापरामुळे काहीही चुकीच न करता तुरुंगात आहेत. आमच्या दोन्ही नेत्यांवर हा अन्याय असल्याचे म्हटले असून आज ना उद्या क्लीन चिट मिळून त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळेल असा विश्वास असल्याचे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
यावर भाजपच्या अतुल भातखळकर यांनी, देशमुखांची चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु आहे, तर प्रत्येक न्यायालयाने प्रथम दर्शनी पुरावे असल्याचे सांगत मंत्री मलिक दोषी असल्याचे म्हटले आहे, असे ट्वीट वर भातखळकर यांनी टीका केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content