तो त्यांचा प्रश्न, आमचा काय संबंध? – फडणवीस

नाशिक, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छत्रपती संभाजीराजेना शिवसेना प्रवेशाची अट असली तरी त्यासाठी संभाजीराजे अनुकूल नाहीत. राज्यसभेच्या अपक्ष जागेचा तिढा कायम आहे, यावर तो त्यांचा प्रश्न, आमचा काय संबंध? असे राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित असून यापूर्वी देखील भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून खासदारकी भूषविली.

यावेळीसुद्धा राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजेनी शिवसेनेत यावे, त्यांना शिवसेनेची राज्यसभेसाठी उमेदवारी देऊ असे शिवसेनेने जाहीर केले आहे. तर छत्रपती संभाजीराजेना शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा नसून महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा, आणि महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, अशी भूमिका शिवसेना, राष्ट्रवादीकडे छत्रपतीनी मांडली होती. राज्यसभेच्या सदस्य निवडीसाठी नामांकनासाठी ३१ मे कालावधी अगदी जवळ आला असून संभाजीराजेंच्या शिवसेना प्रवेशावर घोडे अडून बसले आहे. या संदर्भात आम्हाला का विचारताय? आमचा काय संबंध? असे फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

Protected Content