‘त्या’ आरोपीची गेंदालाल मिल परिसरातून काढली धिंड !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांशी हुज्जत घालून चावा घेवून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांवर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीची राहत्या घरापासून गेंदालाल मील परिसरातून धिंड काढली.

 

जुबेर उर्फ डबल भिकन शेख (वय-२५) रा. गेंदालाल मील, जळगाव असे आरोपीचे नाव आहे. 

 

अशी आहे घटना

घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी जुबेर उर्फ डबल भिकन शेख याच्या घरी बुधवारी ३० मार्च रोजी मध्यरात्री शहर पोलीस कर्मचारी गेले. डबलच्या घरी पोलीस आल्यानंतर कुत्रे भुंकायला लागल्याने डबलला चाहूल लागली. पोलीसांच्या हाती लागू नये म्हणून शेजारी राहणाऱ्या अफसरबेग नूरबेग उर्फ कालू यांच्या घरात घुसला. त्यावेळी पोलीसांना धमकी देवून माझ्याजवळ येवू नका नाही तर स्वत:ला मारून ठाकेन अशी धमकी दिली. गच्चीवर जावून पोलीसांच्या अंगावर गॅस सिलेंडर फेकले, सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. आणि जुबेरने उडी मारताच पोलीसांनी त्याला पकडले.  जुबेरला पकडताच त्याची आई मुमताजबी व भाऊ फारुख यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुमताजने पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धांडे यांच्या पाठीला चावा घेत त्यांना जखमी केले. नंतर त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गेंदालाल मिल परिसरातून काढली आरोपीची धिंड 

दरम्यान, पोलीसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी शुक्रवार १ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आरोपी जुबेर उर्फ डबल यांची याची हातात बेड्या ठोकून राहत्या घरापासून गेंदालाल मिल परिसर आणि शिवाजी नगरातील मुख्य रस्त्यापर्यंत धिंड काढण्यात आली. अश्या गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी अशीच धिंड काढवी जेणे करून इतर गुन्हेगार गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील अशी प्रतिक्रिया नागरीकांकडून केली जात होते.

 

पोलीसांचा होता चोख बंदोबस्त

याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सपोनि सर्जेराव क्षिरसागर, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, नरेंद्र ठाकरे, प्रणेश ठाकूर, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण यांची उपस्थिती होती.

Protected Content