धरणगावात काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील ठाकरे गटासह काँग्रसेचे अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात केल्याचे पहायाला मिळाले. यावेळी काँग्रेस आणि ठाकरे गटाला खिंडार पडल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

 

धरणगाव शहरातील काँग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे, शिवसेनेत प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निलेश इंगळे, भगवान महाजन, चंद्रकांत जाधव, राजेंद्र बोरसे, सुभाष चौधरी, मुकेश चौधरी, शांताराम चौधरी, घनश्याम सातव, शब्बीर सय्यद, अखिल कुरेशी, सचिन कासार यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

 

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सत्कार केला. याप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक भरत भाटिया, छोटू जाधव, मुकुंद नन्नवरे, सचिन दादा पवार, आबा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content