नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे दहशतवादी समुद्र मार्गानेही हल्ला करू शकतात, अशी शक्यता नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी व्यक्त केली आहे. ते संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
तीन आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भयावह रूप सगळ्यांनीच बघितले आहे. भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या देशाचा दहशतवाद्यांना पाठिंबा आहे.आता दहशतवाद वैश्विक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. एका देशाने पुरस्कृत केलेल्या दहशतवादाचे परिणाम भारत भोगत आहे, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.