Home राष्ट्रीय जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; चार नागरिक जखमी

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; चार नागरिक जखमी


6 terrorists entered in tam
 

जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) सोपोरे जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका लहान मुलीसोबत चौघे जखमी झाले आहेत. गोळीबार करत हा दहशतवादी हल्ला करण्यात आला.

 

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी उपस्थित असून तपास सुरु आहे. याआधी २९ ऑगस्ट रोजी काही संशियत दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील परिम पोरा परिसरात गोळीबार करत एका नागरिकाला जखमी केले होते. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवादी हे हल्ले करत असल्याचे यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.


Protected Content

Play sound