Home क्राईम यावल तालुक्यात भयंकर घटना: बाप-लेकीच्या नात्याला फासला काळीमा

यावल तालुक्यात भयंकर घटना: बाप-लेकीच्या नात्याला फासला काळीमा

0
119

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी भयंकर घटना यावल तालुक्यातील एका गावात घडली असून या प्रकरणी संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात एक व्यक्तीचे वास्तव्य आहे. त्याचे जानेवारी 2023 मध्ये लग्न झाले असून त्याला आठ महिन्यांची मुलगी आहे. संबंधीत व्यक्ती हा आपल्या आठ महिन्यांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे त्याच्या पत्नीला आढळून आले. यामुळे ती महिला सावध राहू लागली. मात्र एके दिवशी या माथेफिरू व्यक्तीने आपल्या मुलीस झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर अत्याचार केला. यामुळे त्या महिलेने पोलीस स्थानकात धाव घेऊन आपल्या पतीच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दिली.

या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (1); 65 (2); तसेच बालकांचे लैंगीक अत्याचारपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3, 4, 5 (एल,एम, एन); 6 अन्वये यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल येथील पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या अमानवी कृत्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound