अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या कळमसरे ते शहापूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून याची चौकशी करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
कळमसरे-शहापूर रस्त्यावर असलेल्या मोठी भवानी माता मंदिरापासून पुढचे आठशे मीटर अंतराचे काम हाती घेण्यात आले आहे.याच आठशे मीटर कामात कळमसरे गावाजवळ कॉंक्रेटिकरण काम नुकतेच पूर्ण होण्याचा मार्गावर आहे.परंतु पुढे सुरू असलेल्या रस्ताच्या कामात ठेकेदाराकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. रस्त्यावर वापरली जाणारी खडी पूर्णता माती मिश्रीत असल्याने होणारे डांबरीकरण खरच दर्जेदार होईल का?विहिरींमधील दगड रस्त्याचा कामासाठी सर्रास वापरला जात असून ,यामुळे काम अगदी निकृष्ठ दर्जाचे सुरु असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कळमसरे गावाबाहेरील देखील कॉक्रीटीकरणचे काम निकृष्ट होत असताना येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत काम बंद पाडले होते. गेल्या पाच ते सहा वर्षापासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णता बंद झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: निघाले आहे. पुढे सुरू असलेल्या कामावर या ठिकाणी टाकण्यात आलेली खडी ही अगदी माती मिश्रीत टाकण्यात आली आहे. पुन्हा तीच समस्या या रस्त्याविषयी निर्माण होणार हे निश्चित.
गेल्या पंचवर्षिक मध्ये बर्याचदा या रस्त्याचे काम करा याविषयी लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र काही उपयोग झाला नाही. या पंचचवर्षिक काळात या रस्त्याचे काम सुरु असून मागील वर्षी उन्हाळ्यांत दोन किलोमीटर काम झाले आहे. यावर्षी एक किलोमीटर काम सुरू असून तेही दर्जाहीन होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
साहेब ठेकेदार तुमचं ऐकत नाही का?
या रस्त्यावर सद्यस्थीतीत काम सुरु असून हा कळमसरे -शहापूर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असतो. मात्र या रस्त्याबाबत संबंधीत अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातय का?साहेब ठेकेदार तुमचं ऐकत नाही का? ठेकेदारांवर अधिकार्यांचा वचक राहिला नसेल का?असे अनेक प्रश्न या शहापूर रस्ताबाबत चर्चिले जाताहेत.
या संदर्भात जिल्हा परिषदचे अभियंता खांबोरे यांच्याशी संपर्क साधला असताते म्हणाले की, सदरील रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी ही दर्जेदारच आहे.एखाद ट्रिपमध्ये मातीमिश्रित खडी येवु शकते;यामुळे कामाच्या ठिकाणी टाकण्यात आलेली सर्वच खडी खराब आहे असे म्हणता येणार.