मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पालकांसोबत बैठक घेतली. यात त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठ यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. तसेच ऑफलाईन परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका असल्यास शिक्षकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा लेखन सराव व्हावा. तसेच त्यांना परीक्षेत विचारल्या जाणार्या प्रश्नांचा अंदाज यावा, यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. ’एससीईआरटी’च्या वेबसाइटवर ती मोफत उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती सुध्दा वर्षा गायकवाड यांनी याप्रसंगी दिली.