नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारत व पाकिस्तानच्या सिमेवर दोन्ही देशांच्या सैन्याच्या हालचाली पाहता युध्दजन्य स्थिती निर्माण झाल्याचे अधोरेखीत झाले आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकमध्ये तणावाचे वातावरण निर्मित झाले आहे. यातच कालपासून सुरू असणार्या घडामोडी पाहता युध्दजन्य स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पाकने पश्चिम सीमेवरून सैन्य हटवून ते जम्मू-काश्मीरलगत पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे. भारताने सैन्याने जमवाजमव सुरु केल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीस असल्याची प्रतिक्रिया अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांनी व्यक्त केल्यानंतरच्या घडामोडी या वातावरणातील तणाव वाढविणार्या ठरल्या आहेत.