राज्यात वाढला तापमानाचा पारा


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून उन्हाचे तीव्र चटके जाणवायला लागले आहेत. यासोबतच, राज्याची राजधानी मुंबईतही (Mumbai) उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तसेच, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा येथे उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. तसेच, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथेही कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

आज 15 मार्च रोजी मुंबईतील तापमान 30.28 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. दिवसाच्या कमाल आणि किमान तापमानाचा अंदाज 26.99 अंश सेल्सिअस ते 30.28 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. याशिवाय, सापेक्ष आर्द्रता 49% इतकी असून वाऱ्याचा वेग 49 किमी/तास आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील नागरिकांना उन्हापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.