रेडक्रॉस सदस्यपदी निवडीबद्दल तेजस पाटलांचा सत्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे उपसभापती तथा विद्यमान संचालक तेजस धनंजय पाटील यांची इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा सहयोगी सदस्यपदी नुकतीच निवड झाली. या उल्लेखनीय निवडीबद्दल तेजस पाटील यांचा संघाच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, व्हाइस चेअरमन अतुल भागवत भालेराव, आणि चेअरमन पांडुरंग सराफ यांनी तेजस पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

बैठकीस भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जेंसिंग राजपूत, संचालक नारायण चौधरी, प्रशांत चौधरी, तुषार उर्फ मुन्ना पाटील, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष व संचालक डॉ. नरेंद्र कोल्हे, प्रवीण वारके, देविदास नाना पाटील, सागर महाजन, बाळू फेगडे, नयना चौधरी, चंद्रशेखर चौधरी, यावल कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, तसेच सोसायटीचे व्यवस्थापक संजय भोईटे, सतीश यावलकर, रामचंद्र भोईटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी तेजस पाटील यांनी सर्व मान्यवरांचे मन:पूर्वक आभार मानले व सांगितले की, “शेतकरी व समाजसेवेच्या कामात रेडक्रॉसच्या माध्यमातून अधिक योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन.” कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आयोजन कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पडले. यावल तालुक्यात तेजस पाटील यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content