Home क्रीडा टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी कोणाची होणार निवड ?

टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी कोणाची होणार निवड ?

0
30

Team India3

मुंबई प्रतिनिधी । चौथ्या क्रमांकाचा पेच शेवटपर्यंत न सुटणं आणि संघाच्या बांधणीत अपयश आल्याने काही क्रिकेटप्रेमी हळहळ व्यक्त होत आहे.

जगज्जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या टीम इंडियाचं आव्हान वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. जिंकता येणारा सामना गमावल्यानं क्रिकेटप्रेमी खवळले आहेत. ऐन मोक्याच्या क्षणी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा, फिनिशर महेंद्रसिंग धोनी अपयशी ठरल्यानं त्यांच्या नावानं बराच शंख निर्माण होत आहेत. त्यांच्यासोबतच, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही टीका झाली. चौथ्या क्रमांकाचा पेच शेवटपर्यंत न सुटणं आणि संघाच्या बांधणीत अपयश, या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केलं जातंय. स्वाभाविकच, या ‘गुरु’पदासाठी अन्य पर्यायांचा विचार व्हावा, अशी मागणीही होतेय. परंतु, विराट कोहली आणि रवी शास्त्री ही जोडी कायम ठेवावी, असंही काही जणांना वाटत आहे.


Protected Content

Play sound