जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी परिवाराचा आधारस्तंभ, समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण आणि मातृशक्तीचे तेजस्वी रूप असलेल्या श्रीमती गोदावरी आई वासुदेव पाटील (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी १.३४ वाजता त्यांनी आपल्या भास्कर मार्केट येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, हजारो लोकांच्या उपस्थितीत गुरुवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात पुरोहितांच्या वेदमंत्रोच्चारात, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि उपाध्यक्ष सुभाष पाटील यांच्याहस्ते त्यांना अग्निडाग देण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेस हजारो समाजबांधव, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली. भास्कर मार्केट येथून सुरू झालेली अंत्ययात्रा शोकसागरात बुडालेल्या वातावरणात वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पोहोचली, जिथे पुष्पवृष्टी आणि भजनांच्या स्वरात त्यांना अंतिम निरोप देण्यात आला.

स्व. गोदावरी आई पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून समाजबांधव आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत श्रद्धांजली वाहिली. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा शोकसंदेशही यावेळी वाचनासाठी प्राप्त झाला, जो काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी वाचून दाखवला. शोकसंदेशात गोदावरी आईंच्या सामाजिक कार्याचे आणि त्यागमयी जीवनाचे स्मरण करण्यात आले.
या अंत्ययात्रेस आणि श्रद्धांजली सभेस माजी आमदार, आमदार, माजी महापौर, डॉक्टर, संपादक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक गुरुजन, उद्योजक, वकील, बँकर्स, शिक्षक, तसेच गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांतील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्याशी संबंधित असलेले हजारो लोक आपल्या डोळ्यांत अश्रू आणि मनात कृतज्ञता घेऊन त्यांना अंतिम निरोप देत होते.
यावेळी परीवारातील मार्तंड भिरूड, प्रा. डॉ. सुषमा पाटील, डॉ. वर्षा पाटील, प्रमिला भारंबे, सुधाकर भारंबे, डॉ. किरण भिरूड, डॉ. अंजली भिरूड, सरला भिरूड, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, अनिल पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. सुरेखा बोरले, डॉ. समर पाटील, डॉ. अस्मिता पाटील, रूपाली चौधरी, जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, पवनकुमार महाराज, नवनित महाराज, शाम चैतन्य महाराज, कुंडलेश्वर धामचे भरत बेडीकर महाराज, आमदार अमोल जावळे, आमदार राजूमामा भोळे, माजी आयजी बी.जी. शेखर, माजी आमदार लताताई सोनवणे, माजी आ. रमेश चौधरी, माजी आ. अॅड. जयप्रकाश बाविस्कर, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. जी.एन. पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, बाफना ज्वेलर्सचे सुशील बाफना, संजयदादा गरूड, रमण भोळे, डॉ. राजेंद्र फडके, डॉ. अर्जुन भंगाळे, माजी महापौर आशाताई कोल्हे, सिंधुताई कोल्हे, चंदन कोल्हे, राधा कोल्हे, दीपिका चौधरी, विष्णू भंगाळे, भागवत भंगाळे, मल्टीमिडीया फिचर्सचे सुशील नवाल, अरूणाताई शिरीष चौधरी, उदयसिंह पाटील, रमेश महाजन, अर्जुन चौधरी, शरद जिवराम महाजन, सुरेश धनके, जगदीश फिरके, दिनेश भंगाळे, कुंटुंबनायक ललितदादा पाटील, सुहास चौधरी, अनिल वारके, संजय पाटील, अनिल लढे, लिलाधर चौधरी, अजय भोळे, वासुदेव बोंडे, अॅड. रवींद्रभैय्या पाटील, अजबराव पाटील, अॅड. संदीपभैय्या पाटील, सुधाकर चौधरी, हभप भरत महाराज, हभप ऋषिकेश महाराज, मुकुंदा रोटे, सुनील महाजन, सुरेश पाटील, शिवसेनेच्या शुभांगी पाटील, राजेश कोतवाल, वासुदेव भिरूड, विनोद शिंदे, डॉ. राधेशाम चौधरी, राजेंद्र नन्नवरे, अतुलसिंह हाडा, बंडुदादा काळे, लालचंद पाटील, दै. लोकमतचे संपादक किरण अग्रवाल, व्यवस्थापक गौरव रस्तोगी, दै. दिव्यमराठीचे श्रीकांत धनके, ईश्वर पाटील, दै. देशदूतचे संपादक हेमंत अलोने, वितरण व्यवस्थापक विजय महाजन, दै. देशोन्नतीचे आवृत्तीप्रमुख मनोज बारी, दै. नवराष्ट्रचे संपादक विकास भदाणे, दै. साईमतचे संपादक प्रमोद बर्हाटे, दै. लोकशाहीचे संपादक राजेश यावलकर, प्रसाद जोशी, लाईव्ह ट्रेन्डचे संपादक शेखर पाटील, जळगाव लाईव्हचे डॉ. युवराज परदेसी, सागरमल जैन, सुधाकर बारी, शांताराम गुजर, प्रदीप लोढा, दगडू पाटील, यु.यु. पाटील, गोकुळ भोळे, करीम सालार, अजिज सालार, ज्ञानेश्वर महाजन, दारा मोहम्मद, प्रदीप पवार, सुलोचना वाघ, तिलोत्तमा पाटील, वासुदेव नरवाडे, नरेंद्र नारखेडे, पी.आर. चौधरी, डॉ. अनिल पाटील, वसंतराव कोल्हे, डी.के. पाटील, आर.जी. पाटील, रविंद्र नाना पाटील, के. बी. पाटील, पी.ई. तात्या पाटील, राजीव पाटील, एस.डी. चौधरी, सुभाबाई सुरवाडे, गोकुळ सुरवाडे, डॉ. प्रशांत भोंडे, नवल पाटील, आबा पाटील, संदीप सोनवणे, अरविंद विखे, उदय विखे, डॉ. सतीश पाटील, जगन सोनवणे, गोदावरी शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांच्यासह हजारो मान्यवरांनी स्व. गोदावरी आई यांना आदरांजली अर्पण केली.
गोदावरी आई पाटील यांनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्षांवर मात करत कुटुंब, समाज आणि संस्थांमध्ये प्रेरणादायी भूमिका बजावली. त्यांचा त्याग, संयम आणि समाजासाठीचा व्रतस्थ दृष्टिकोन अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत राहील. त्यांच्या निधनाने जळगाव जिल्ह्याने एक कणखर, मातृवत, आणि स्नेहसंपन्न व्यक्तिमत्त्व गमावले आहे.



