यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाी येथील फर्निचरच्या दुकानातून एक लाख रूपयांचे अवैध सागवान लाकूड जप्त करण्यात आल्याने लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
येथील पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल यांच्या कार्यक्षेत्रात गुप्त माहीतीच्या आधारे केलेल्या कार्यवाहीत सुमारे १लाख रुपये किमतीचे सागवान जातीचे विविध तयार केलेले माल जप्त करण्यात आला आहे. यावलच्या पश्चिम वनक्षेत्रा अंतर्गत येणार्या किनगाव गावातील रामचंद्र पाटील यांच्या फर्निचरच्या दुकानात मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व यावल पश्चीम वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सुनील मिलावे ,यावलच्या पुर्व विभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या पथकाने दिनांक १ ऑगस्ट रोजी अवैध फर्निचर दुकानवर वन कर्मचारीसह सापळा रचुन धाड टाकली.
या धाडीत दरवाजा फालके ०८, पलंग ०२,सोफा सेट ०१,सागवानचे नग ७२, चौरंग ०४ तसेच लाकूड कट्टर मशीन १असा सुमारे एकुण माल किंमत १ लाख रूपये किमतीचे साहित्य कार्यवाहीत जप्त करून मुख्य विक्री केंद्र यावल जमा केला आहे. सदर गुन्हा दाखल वनपाल वाघझिरा यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ ( १ ) (अ) ( ३), ४१( २) अन्वये केला आहे. ही कार्यवाही वनक्षेत्र यावल पश्चिम व वनक्षेत्र रावेर अधिनस्थ स्टाफ यांनी संयुक्त रित्या केली.पुढील तपास वनपाल वाघझिरा हे करित आहेत.वन विभागाने केलेल्या कार्यवाहीत वृक्षतोड माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.