पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबापिंपरी येथील ग्राम विकास शिक्षण संस्था संचलित कै एच पी पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकतेच क्षेत्र भेटीतून विविध उद्योग व्यवसाय समजून घेतले.
भूगोल विज्ञान इंग्रजी गणित अशा विविध विषयांना अनुसरून समन्वयात्मक अध्ययन-अध्यापन पद्धतीचा तसेच प्रत्यक्ष अध्ययन लाईव्ह इंग्लिश याअंतर्गत कोळपिंपरी शिवारात असलेला लघुउद्योग श्री कृष्णा सिमेंट पेवर ब्लॉक उद्योग या कारखान्याला विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिंनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात असलेल्या विविध प्रश्न विचारलेत. त्यांच्या प्रश्नांना उद्योग समूहाचे संचालक गणेश काटे व रमेश काटे यांनी उत्तर देत मार्गदर्शन केले. त्यात कोणत्या पद्धतीचे केमिकल वापरले जाते, त्यांची सुकवण्याची पद्धत कशी आहे, तसेच जवळचे मार्केट व सेलिंग कशा पद्धतीने केले जाते या विविध प्रश्नांची माहिती श्री. काटे यांनी दिली. यावेळी शाळेचे शिक्षक डी डी पाटील, श्री. कचवे व श्री.लोहार उपस्थित होते.