राज्यात शिक्षकांचे एक दिवशीय लाक्षणिक कामबंद आंदोलन

work

 

चोपडा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील शासकिय निमशासकिय कर्मचाऱ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने आज दि. ९ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या १३ प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात एक दिवशीय लाक्षणिक कामबंद आंदोलन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्यातील शासकिय निमशासकिय कर्मचाऱ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या १३ मागण्यांसाठी दि. ५ ते ७ सप्टेंबरपर्यंत काळीफित लावून निषेध करण्यात आला असून २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेली अंशदायी पेंशन योजना ही कुंटुबव्यवस्था उध्वस्त करणारी असल्याने ती बंद करून जुनी पेंशन योजना लागू करावी, या मागण्यांची शासनाने दाखल अथवा पूर्तता न झाल्यास दि. ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत चोपडयातील म. तहशीलदार अधिकारी, पं.स. गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले. निवेदनावर सर्व शिक्षक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी राजेंद्र सांळुखे, देवेंद्र पाटील, योगेश सनेर, सतिष बोरसे, संभाजी (राजे) पाटील, भरत शिरसाठ, प्रल्हाद ठाकरे, अनिल पाटील, संजय चौधरी, विवेक पाटील, अनिल पाटील, धनराज बडगे, सुनिल ढाकणे, चंद्रशेखर साळुखे, विजय कचवे, दिप्ती सनेर, आशालता महाजन, सरला राजपूत, दिपाली बडगुजर, नयना जैस्वाल, समाधान पाटील, राजेश बडगुजर, राकेश पाटील, रोहिदास कोळी, असे एकूण ४००ते ४५० शिक्षकांच्या सह्या असून मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले होते. प्रास्ताविक संभाजी पाटीलांनी केले तर उपस्थिती कर्मचारीचे आभार भरत शिरसाठ यांनी मानले.

Protected Content