
यावल (प्रतिनिधी) शहरातील गुरुदत्त नगरमधील रहिवाशी आणि डोंगर कठोरा येथील शासकीय माध्यमीक आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिका शारदा लहू चौधरी या 19 मे रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत.
शिक्षिका शारदा चौधरी यांनी तब्बल ३२ वर्षे ज्ञानदानाचे सेवाकार्य केले. त्यांनी तीन वर्षे ठाणे, मुंबई व नंतर जळगाव जिल्ह्यात 29 वर्षे सेवा केली. त्या सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एल.बी. चौधरी यांच्या पत्नी आहेत. डोंगर कठोरा आश्रम शाळेतर्फे त्यांना सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सन्मान करून नुकताच सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात आला. याप्रसंगी डोंगर कठोरा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, अधिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.