पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील यशवंतनगरमधील जि.प. शाळातील शिक्षिका मनिषा आहिरराव यांना नुकताच आदर्श शिक्षिका गिरणागौरव प्रतिष्ठान आणि एस.के.डी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साने गुरुजी शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पुरस्कार वितरण कार्यक्रम 31 ऑगस्ट रोजी जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्या आमडदे येथील रहिवाशी व प्राथमिक शिक्षक प्रविण शिवहार सोनार यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. त्यांच्या या पुरस्काराने आमडदे गावात मानाचा तुरा रोवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या पुरस्काराने गावातील जेष्ठ नागरिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.